Alpa Bachat Bhavan, 7, Queens Garden Road, Pune 411001-Phone: +91 20 2636 0987

Rules

संस्थेचे विविध हॉल घेणाऱ्यांने पाळावयाचे नियम व अटी 

DOWNLOAD BOOKING FORM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नविन नियम व अटी

A/C, Non A/C रूम बुकिंग करिता

१.कार्यालयाच्या आणि इतर ठिकाणी सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक राहिल.
२.कार्यालयाच्या आणि इतर ठिकाणी,रूम मध्ये थुंकणेस सक्त मनाई आहे.आणि त्याचे उल्लघन केल्यास सदरील दंडनिय कारवाईस पात्र राहील.
३. रूम मध्ये फक्त (१) एकच व्यक्‍ती राहू शकतो व दोन व्यक्ती जवळ आल्यास त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल
डिस्टंसिंग) सहा फुट राखणे बंधनकारक राहिल.

लग्न सभांरभाच्या ठिकाणी,आर्ट गालारी, मिटींग हॉल साठी

१.लग्न सभांरभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक राहिल.
२.लग्न सभारंभाच्या ठिकाणी थुंकणेस सक्त मनाई आहे.आणि त्याचे उल्लघन केल्यास सदरील दंडनिय कारवाईस
पात्र राहील.
३. लग्न सभारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्‍ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल
डिस्टंसिंग) सहा फुट राखणे बंधनकारक राहिल.
४. लग्न सभारंभाच्या ठिकाणी गुटका, पान, तंबाखु खणेस व मद्यपानास सकत मनाई राहील.
५. लग्न सभारंभाची जागा वारंवार हाताळणे जाणारे भाग निर्जतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
६. लग्न सभारंभाच्या आत व बाहेर जाण्याचे थर्मल स्कॅनिंग हात धुणे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
कोणत्याही परिस्थितीत वातानुकुलीत सेवेचा (५९) चा वापर करणेत येवु नये .
७. लग्न सभारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पदधतीने खूणा ( मार्कीग) करुन
निश्‍चित करणेत याव्यात.
८. लग्न सभारंभाच्या ठिकाणी पा्कोंग व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येईल.
९. लग्न सभारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राह-याची यादी संस्थेस जमा कराबी.
१०. लग्न सभारंभ करण्याकरीता कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनमधून पोलीस परवाना काढून त्याची प्रत संस्थेत जमा
करावी.
११. लग्न सभारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन न करत नसल्याचे निदर्शनास आले तर
तात्काळ कार्यक्रम रदद करण्यात येईल. सदर आदेशाचा भंग करणा-या कार्यवाहक विरुध्द भारतीय साथ अधिनियम
१८९७ प्रचलित इतर अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील
शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कार्यबाही करण्यात येईल.

  1. महाराष्ट्र राज्य सेवकांस अल्पबचत संकुलामधील विविध हॉल आरक्षण करतेवेळेस कार्यालयाचे शिफारस पत्र, स्वत:चे ओळखपत्राची  छायाप्रत, रेशनकार्ड छायाप्रती व सेवानिवृत्त कर्मचा-यांने महालेखापाल मुबंई पी.पी.ओ. यांची प्रत सादर करणे आवश्यक आहे.कार्यवाहकावर अवलंबून ज्यांचे लग्न आहे त्यांच्या स्वत: साठी त्यांचे मुलामुलींसाठी, लहान भाऊ, बहीण, त्यांच्या मंगल कार्यासाठी विविध हॉलचे/ लॉनचे सवलतीेचे दराने आरक्षण करता येईल.
  2. संस्थेचा मुख्य हॉल आदल्या दिवशी रात्री 8.00 वाजता ताब्यात देण्यात येतो व कार्याचे दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हॉलचा ताबा दिला जातो. संस्थेच्या वेळेपेक्षा हॉलची जादा उपलब्धता भासल्यास प्रति तास या प्रमाणे हॉलची वेगळी आकारणी करुन उपलब्धतेनुसार पुढील आरक्षण देण्यात येईल.
  3. संकुलातील मुख्य हॉल भाडे, मध्ये मुख्य हॉल, वधु वर कक्ष, नॉर्थ लॉन, लॉन ग्री रुम, साउंड सिस्टीम, पार्कींग, सर्व्हीेेस टॅक्स, विद्युत,  500 खुर्च्या, डायनिंग हॉल, इत्यादीची होणारी रक्कम पुर्णत: भरणा करुनच हॉलचे आरक्षण करता येईल. नॉर्थ लॉनची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यत राहील.
  4. संस्थेचे विविध हॉलमध्ये करावयाचे डेकोरेशनसाठी फुलवाला, मंडपवाला, केटरींग संस्थेने नेमलेल्या निविदाधारक   त्यांच्याकडून वाजवी दराने हे काम करुन घ्यावे.
  5. परताव्याची रक्कम ही सेवा कराची रक्कम वजा जाताउर्वरित रकमेतुन पावती मागील अटी व नियम 2 मधिल 1 ते 5 नुसार अदा केला जाईल.
  6. एका पेक्षा जास्त लग्नाच्या कार्यक्रमाला प्रत्येकी 25% रक्कम जादा आकारली जाईल
  7. हॉलचा ताबा कार्यवाहकास दिल्यानंतर तो परत देईपर्यंत कार्यवाहकाने आपले साहित्य व मौल्यावान वस्तु सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:चे कुलपे घेवून जावे कोणतीही वस्तु चोरीस गेल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही.
  8. संस्थेचे विविध हॉलमध्ये भिंतीस कोठेही खिळे, स्क्रू, बॅनर चिटकवू अगर ठोकू नयेत.
  9. हॉलमधील विद्युत प्रवाह विद्युत मंडळाकडून खंडीत झाल्यास, डिझेल जनरेटर सुविधा कार्यवाहकाने मागणी केल्यास संस्थेकडून सुविधा त्वरीत उपलब्ध केली जाईल.
  10. संस्थेने नेमस्त केलेल्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी वाहने लावण्याची जबाबदारी कार्यवाहकाची आहे त्यासाठी खाजगी सुरक्षा व्यवस्था कार्यवाहकाने आणावी.
  11. संस्थेत कार्यक्रमाचा काही कायदेशीर वाद निर्माण झाल्यास पुणे न्यायालयीन कक्षेत सोडविण्यात येईल.
  12. हॉलचे आरक्षणामधील पॅकेज व्यतिरीक्त सामानाशिवाय लागणारे जादा सामानाची व सुविधांची यादी आठ दिवस अगोदर संस्थेने  नेमलेल्या निविदाधारक ü यांना अगोदर सांगण्यात यावे त्यांची बाजारभावाप्रमाणे रक्कम आकारण्यात येईल.
  13. वरील सर्व मुद्दयांची / सुचनांची / अटींची शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
  14. संस्थेच्या दोन्ही लॉनवर कार्यक्रम असल्यास म्युझिक सिस्टीम (डी.जे.) वाजविण्यास सक्त मनाई आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
  15. संस्थेमध्ये कार्यक्रमाच्या वेळी धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. कार्यक्रमाच्या वेळेस मद्याचा वापर करावयाचा असेल तर राज्य सेवा शुल्क विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
  16. एसी कॉन्फरन्स हॉल 1 व 2 मध्ये होणारे कार्यक्रमासाठी संस्थेतील गेट क्र. 3 व हॉलमधील कार्यक्रमासाठी गेट क्र. 1 चा वापर करावा कोणत्याही परिस्थितीत या कार्यक्रमासाठी गेट क्र. 2 चा वापर करु नये.
  17. मुख्य हॉल कार्यक्रम असल्यास म्युझिक सिस्टीमचा वापर मर्यादित 55 डे.सी. मध्येच असावा अन्यथा विद्युत प्रवाह खंडीत केला जाईल.
  18. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या कुठल्याही मालमत्तचे नुकसान झाल्यास (मुख्य हॉल विश्रामगृह) सदरची नुकसान भरपाई संबंधीतांकडून करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  19. लग्नाचा कार्यक्रम असल्यास लग्नविधी सुरु होण्यापुर्वी लग्नपत्रिका संस्थेच्या कार्यालयात जमा करावी.
  20.  संस्थेच्या मुख्य हॉल , लॉन , स्टेज व डायनिंग हॉल ,पार्कीग ,वरिल अतिरिक्त विद्युत वापरासाठी अगाऊ रु 3000/-भरावे लागतील.
  21. बाहेरिल केटरिंग व्यवस्था आणल्यास अन्य सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 चा परवाना देणे बंधनकारक आहे व  रु 20,000/- निविदेत नमुद नुसार निविदाधारक यांना देणे गरजेचे आहे.
  22. संस्थेचा परिसर निवासी झोनमध्ये असल्याने 55 डेसिबल ध्वनी क्षेपकाची मर्यादा ठेवावी व रस्त्यावर मिरवणुक काढण्यास मनाई आहे. फटाके वाजवू नयेत त्यासंबंधी कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनमधून पोलीस परवाना काढून त्याची प्रत संस्थेत जमा करावी.
  23. कार्य व कामे त्याचे कार्य संस्थेच्या परिसरामध्ये असेल त्यांनी त्यांचे साहित्य व मौल्यवान वस्तू सांभाळणे गरजेचे आहे कोणतीही वस्तू चोरीस गेल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही

 परतावा रक्कम

संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक दिनांक 31/1/ 2001 मधील ठराव क्रमांक 13 अन्वये कार्यासाठी आरक्षण केलेल्या कार्यवाहकाचे कार्य काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाल्यास खालील प्रमाणे रक्कम परतावा म्हणून परत मिळेल

  1. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 7 दिवस अगोदर रद्द केल्यास परत करावयाची रक्कम काही नाही
  2. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 8 ते 15 दिवस अगोदर रद्द केल्यास परत करायची रक्कम 25%
  3. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 16 ते 30 दिवसाच्या अगोदर रद्द केल्यास परत करावयाची रक्कम 50 %
  4. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत रद्द केल्यास परत करावयाची रक्कम 75%
  5. कार्यवाहकाने मंगल कार्यालय आरक्षित केल्या नंतर कौटुंबिक दुर्घटनेमुळे मृत्यूमुळे आरक्षण रद्द करावे लागले तर अशा प्रसंगी आरक्षण दिनांकास दुसऱ्या कार्यवाहक का कडून तो दिनांक आरक्षण हो अगर न हो तरीही परत करावयाची रक्कम (कागदोपत्री पुरावा देणे गरजेचे आहे) 100%
Renovation work in progress.
नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याने, खोल्या आणि हॉलचे आरक्षण पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आले आहे. Due to renovation work in progress, reservation of rooms and halls has been paused until further notice.
X
0
    0
    Your Booking
    Your cart is emptyReturn to Shop