Alpa Bachat Sanskrutik Bhavan, MG Road, Pune is a perfect venue to host your wedding and reception ceremony. It is located near the Pune Junction which makes it easily accessible for all to reach there. Alpa Bachat Bhavan Pune serves multi-cuisine delicacies in both vegetarian and non-vegetarian food to their guests. It has a spacious banquet hall that can fit a large gathering for your function.
Alpa Bachat Bhawan also has a lush green landscape that is ideal for having an open-air function under the starlit sky. The elegant décor of the venue makes it an ideal option for a grand wedding. Alpa Bachat Hall Pune has an inviting ambience which makes your guests feel welcomed. It is a simple space that can make any event look classy and beautiful. Book Alpa Bachat Bhavan 7 Queens Garden Road Pune to make your functions eventful.
________________________________________________________________________________________________________
महाराष्ट्र राज्य सेवकांची सांस्कृतिक संस्था (अल्पबचत संकुल) पुणे बाबत माहिती
स्थापना-
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना सार्वजनिक सुविधा अल्प मोबदल्यात उपलब्द करून देण्याच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र राज्य सेवकांची सांस्कृतिक संस्था (अल्पबचत संकुल) ही संस्था सन 1978 साली स्थापन करण्यात आलेली आहे. सदर संस्थेची नोंदणी सहा धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे रजिस्टर क्रमांक पी टी एफ 1182 नुसार करण्यात आलेली आहे.
भुखंड-
- संस्थेची ध्येय व उद्दिष्टे विचारात घेवुन राज्य शासनाने त्याचेकडील ज्ञापन क्रमांक एलएनडी /3478/332070/1226/जी -6 दिनांक 15/01/1979 अन्वेय पुणे कॅन्टोमेन्ट हद्दीतील सर्वे नं. 52 बंगला नं 7 क्षेत्र 3-87 एकर या जमिनी पैकी 70,000 चैा फु. जमिन अल्पबचत संकुल उभारणी करीता मंजुर केलेली आहे. त्यानुसार सदर जागेवर आज पुणे विभागातील सर्वात मोठे शासकीय कर्मचा-यांचे सांस्कृतिक भवन उभारण्यात आलेले आहे.
सुविधा-
सदर सांस्कृतिक भवनात शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुबियांना लग्न कार्यासाठी व इतर सांस्कृतिक कार्यासाठी अल्प किमतीत उपलब्ध केले जाते.तसेच कर्मचारी व अधिकारी यांच्यामंध्ये समन्वयाचे वातावरण निर्माण होण्याकारीता सांस्कृतिक कार्यक्रमा व क्रिडा प्रकाराचे अयोजन संस्थेमार्फत केले जाते.तसेच या स्ंकुलामंध्ये विश्रामगृह क्रमांक एक मंध्ये वातानुकुलित 10 कक्ष व विश्राम गृह दोन मंध्ये 9 साधे कक्ष व 4 वातानुकुलित कक्ष निर्माण करण्यात आलेले आहे त्यामंध्ये राज्य अतिथी पासुन शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांची राहण्याची अल्प दरामंध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे
अल्पबचत संकुलची दिनांक 13/6/2016 रोजी घटनेच्या दुरूस्त मसुद्यास मा. सहा धर्मदाय आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे.त्यानुसार दोन प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या असुन सदर समितींच्या बैठकीचे स्वरुप व कार्यकालाचा तपशिल खालील प्रमाणे
- बोर्ड ऑफ ट्रस्टी
अ क्र | नाव | संस्थेचे पद |
1 | श्री. सौरभ राव | अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त पुणे |
2 | डॉ. राजेश देशमुख | उप अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पुणे |
3 | श्री. सुरज मांढरे | सदय्स तथा मुख्य कार्यकारी अधिाकरी पुणे |
4 | श्री. सुनिल केद्रेकर | सदस्य तथा आयुक्त क्रिडा पुणे |
5 | श्री. प्रताप जाधव | सचिव तथा उप आयुक्त (महसुल) पुणे |
6 | श्रीमती शुभांगी माने | सदस्य तथा लेखा व कोषागार पुणे |